ठळक मुद्देअर्शीचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अर्शीचे कपडे खूपच विचित्र असल्याचे नेटिझन्स देखील कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

बिग बॉस या कार्यक्रमाचा 14 वा सिझन नुकताच पार पडला. या सिझनमध्ये रुबीना दिलैक विजेती ठरली. या सिझननंतर सलमान खानने बिग बॉसमधील स्पर्धकांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बिग बॉसमधील अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यांमध्ये नेटिझन्सचे लक्ष अर्शी खानने वेधून घेतले. अर्शीच्या कपड्यांचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

अर्शी खानने गोल्डन रंगाचा एक ड्रेस घातला होता. हा ड्रेस इतका विचित्र होता की, सलमान खानला देखील अर्शीला पाहून त्याचे हसू आवरले नाही. तू बिग बॉसमधील सोफा का गुंडाळून आली आहेस असे विचारत सलमानने अर्शीची खिल्ली उडवली. अर्शीचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अर्शीचे कपडे खूपच विचित्र असल्याचे नेटिझन्स देखील कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. अर्शी खानने हे कपडे घालताना जगप्रसिद्ध पॉपस्टार लेडी गागाला कॉपी केले अशी देखील टीका काही नेटिझन्स तिच्यावर करत आहेत. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये लेडी गागा अशाच प्रकारचे कपडे घालून आली होती. त्यावेळी तिला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते.

अर्शी खानने बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. या सिझननंतर पुन्हा एकदा या सिझनमध्ये अर्शीला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली होती. बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला होता. बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेल्या अर्शी खानला जरी मोठे प्रोजेक्ट मिळाले नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत असतात.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Salman Khan's Reaction To Arshi Khan’s Dress At Bigg Boss 14 After-Party Will Leave You In Splits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.