rekha confessed in indian idol, she was mad for married man, watch this video | एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली, पाहा हा व्हिडिओ

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देइंडियन आयडॉल या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे.

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा उपस्थित राहाणार आहेत. त्या आपल्या जीवनातील किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे.

हा व्हिडिओ सोनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. इंडियन आयडॉलच्या या व्हिडिओत या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक जय भानुशाली रेखा आणि नेहा यांना विचारत आहे की, कोणती महिला एखाद्या पुरुषाच्या मागे इतकी वेडी झाली आहे आणि तेही एका विवाहित पुरुषाच्या मागे... असे तुम्ही पाहिले आहे का... यावर कोणीतरी मला विचारा असे रेखा उत्तर देताना दिसत आहेत आणि त्यानंतर लगेचच मी काहीही बोलली नाही असे सावरताना दिसत आहे... यावर सगळे उपस्थित हसताना आणि उभे राहून टाळ्या वाजवताना दिसत आहे. यावर ये लगा सिक्सर असे जय बोलत आहे.

रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रेखा आणि अमिताभ यांची लव्हस्टोरी तर चांगलीच फेमस आहे.  जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. त्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे म्हटले जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rekha confessed in indian idol, she was mad for married man, watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.