राम कपूर आणि गौतमी कपूरची जोडी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. राम कपूर नेहमी पत्नी गौतमी कपूरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. राम कपूरने इन्स्टाग्रामवर गौतमीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. जो रामच्या चाहत्यांंना खूपच आवडला आहे. रामच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  या फोटोत राम कपूर काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसतोय तर गौतमीने साडी परिधान केलेली आहे. या फोटोला कॅप्शन देताना राम कपूरने लिहिले. वे बॅक वेन...राम आणि गौतमीचे लग्न 2003मध्ये झाले आहे. दोघांना दोन मुलंदेखील आहेत. 

आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. रामला 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

राम कपूरची पत्नी गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे. घर एक मंदिर मालिकेदरम्यानच दोघांची भेट झाली होती. पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. राम कपूर आणि गौतमी गाडगीळ यांची भेट २००० ते २००२ दरम्यान प्रसारित करण्यात आलेल्या ‘घर एक मंदिर’ या मालिकेदरम्यान झाली. दोघे या मालिकेत काम करत होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ram kapoor shares a throwback picture with wife gautami this is how fans reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.