कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ''शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है'' आयटम गर्ल राखी सावंत हल्ली सारखं हे गाणं गुणगुणत असते. काही वर्षापूर्वी तिनं योगगुरुंवर फिदा असल्याचं म्हटलं होतं.

 

त्यानतंर राहुल गांधींशी लग्नाची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर तिने लग्न झाल्याचे सांगत ड्रामाही केला. लग्न केल्यानंतरही पती रितेश तिच्यासह राहत नसल्याचे तिने सांगितले. हीच ड्रामागिरी राखीसाठी फायदेशीर ठरली आणि पुन्हा एकदा तिने बिग बॉसच्या घरात दणक्यात एंट्री घेतली. घरात एंट्री केल्यापासून राखी सावंत लग्नाच्या खयालोंमध्ये असते.

'बिग बॉस १४'मध्ये मोस्ट इंटरटेनर स्पर्धक म्हणून राखी सावंत रसिकांची पसंती मिळवत आहे. राखीच्या एंट्रीनंतर शो अधिकच रंगत बनला आहे. घरात एंट्री करताच राखीची नौटंकी काही थांबली नाही. रुबीना दिलैक आणि अभिनव ही जोडी तिची फेव्हरेट आहे. रुबीनासह तिची खास गट्टीदेखील जमली आहे. मात्र अभिनवची पत्नी बनायची राखीची ईच्छा आहे. त्यामुळे सतत अभिनवचे गोडवे गाताना राखी दिसते.

सध्या राखी अभिनवच्या प्रेमात आकंत बुडाली आहे. दिवस रात्र ती अभिनवसह लग्न करण्याची स्वप्न रंगवत आहे. त्यामुळे अभिनवच्या मुलाची आई बनण्याचीही ईच्छा राखीने बोलून दाखवली. शो संपताच रुबीनासह याविषयी राखी सावंत बोलणार आणि अभिनवच्या मुलांची आई बनणार असे तिने म्हटले आहे. मला वेड लागले प्रेमाचे हेच शब्द सध्या राखीच्या ओठावर आहेत, पुन्हा एकदा लव के चक्कर मध्ये असलेली राखीमुळे रुबीनाचा पत्ता कट होवू नये म्हणजे झालं.

 

स्पॉटबॉयने एका एक्सक्लुसिव्ह वृत्ताच्या माध्यमातून राखीचे लग्न झालेच नसल्याचे म्हटले आहे. राखी सावंत याआधीही असेच खोटे दावे करत आली आहे आणि रितेश नावाच्या एनआरआयसोबत लग्न झाल्याचा तिचा दावाही खोटा आहे. तिचे लग्न झालेलेच नाही, असे या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये राखीने ती दिपक कलालशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण नंतर हा सगळा ड्रामा असल्याचे सिद्ध झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rakhi Sawant Reveals Her Eagerness For Becoming Mother Soon Will Be Giving Good News After Coming Out From the Bigg Boss14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.