New twist in 'My Husband's Wife', Gurunath's mother plotted against him and Maya | 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट, गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात आखली योजना


छोट्या पडद्यावर 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने सुरूवातीपासूनच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. गुरू, राधिका, शनाया, जेनी या भूमिकेप्रमाणे काही पात्र विशेष लक्षवेधी तसंच रसिकांच्या काळजात घर करून आहेत. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. तर गुरूनाथच्या आईने त्याच्या आणि मायाच्या विरोधात योजना आखली आहे.


नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात गुरूनाथची आई म्हणजेच सरीता गुरूनाथ आणि मायाच्या विरोधात कट रचला आहे. एपिसोडची सुरूवात गुरूनाथ आणि त्याची आई जेवणासाठी बसण्याची तयारी करत असते आणि गुरूला जेवायला बोलवते. त्यासाठी गॅरी आईला मदत करतो आणि जेवण वाढतो. ते जेवायला सुरूवात करतात. गुरूनाथ आईला त्याच्यासाठी छान पदार्थ बनवले म्हणून आभार मानतो. त्यावेळी आई गुरूनाथला टोमणे मारते की शनायासोबत नको राहूस असे सांगितले होते तरी ऐकले नाही. सरीता हे पण बोलतात की जर राधिकासोबत तू राहिला असतास तर आनंदी राहीलास असता.   

सरीता मायाला देते जेवणाचे निमंत्रण
गुरूनाथ आईचे बोलणे ऐकून नाराज होतो. तो आईला जुन्या आठवणींबद्दल बोलू नकोस असे सांगतो. शनाया तूला सोडून गेली. राधिकाला तू सोडल्यानंतर ती दुःखी झाली होती. तशी आता शनायादेखील दुःखी असेल म्हणजे आता त्या दोघी समदुःखी. आता तू काय वेगळे करायचे ठरविले आहेस, ते मला सांग असे आई गुरुनाथला विचारते. शनाया असताना तुझ्या आयुष्यात तिसरी कुणी तरी आले असेल ना. आई नाव न घेता मायाबद्दल विचारते. त्यावर गुरूनाथ बोलतो की बॉससोबत माझे असे काही नाही. त्यावर आई मायाला घरी जेवणासाठी बोलवते. गुरूनाथला धक्का बसतो. सरीता मायासमोर गुरूनाथचे खरे रुप आणण्याचे ठरविते.


तर दुसरीकडे राधिकाच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. जेनी आणि आनंद राधिकाला छान जेवण बनवल्यामुळे कौतूक करत असतात. त्यानंतर ते राधिकाचा विजय झाल्यामुळे उद्या पार्टीचे आयोजन करतात. राधिका, आनंद व जेनी टेन्शनमध्ये येतात कारण सौमित्र पार्टीसाठी पदार्थ बनवणार. राधिका त्याला समजवते की मी बनवते जेवण. पण सौमित्र ऐकतच नाही. शेवटी ते दोघे अर्धे अर्धे जेवण बनवणार असे ठरते. त्या पार्टीसाठी राधिका शनायालाही बोलवते.

शनाया गुरूनाथच्या घरी असते. शनाया तिच्या आईला राधिकाच्या परिस्थितीबद्दल सांगते. ती खूप चांगली आहे असे सांगते. राधिका शनायाला पार्टीसाठी बोलवते. तर गुरूनाथ मायाला आईने जेवणासाठी घरी बोलवल्याचे सांगतो. माया गोंधळून जाते. तर पार्टीसाठी जेवण बनवायला लागतो. राधिका त्याला जेवणाची तयारी करताना पाहून घाबरते आणि बाहेर येते. शनाया पार्टीसाठी निघायला तयार होते. शनायाची आई राधिकासारख्या चांगल्या लोकांसोबत राहण्याचा सल्ला देते. तर सरीता यांच्या घरात सरीता न्यूजपेपरमधील राधिका आणि शनायाबद्दल हेडलाइन गुरूनाथसमोर वाचतात आणि त्याला टोमणे मारतात. सरीता आणि गुरूनाथ मायाची वाट पाहत असतात. माया पंजाबी ड्रेसमध्ये येते. तिला या गेटअपमध्ये पाहून गुरूनाथ चकीत होतो. आता गुरूनाथची आई मायासोबत काय करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New twist in 'My Husband's Wife', Gurunath's mother plotted against him and Maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.