Neetu Kapoor finds Indian Idol 12 contestant Danishs looks similar to Rishi Kapoor | नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा

नीतू सिंग कपूर म्हणाल्या, इंडियन आयडॉलमधील हा स्पर्धक दिसतो ऋषी कपूर यांच्यासारखा

ठळक मुद्देइंडियन आयडॉलमधील दानिश या लोकप्रिय स्पर्धकाने नीतू सिंग कपूर यांना मंचावर येऊन त्याचे आवडते गाणे ‘एक मैं और एक तू’ वर त्याच्यासोबत डान्स करण्याची गळ घातली. दानिशच्या लुक्समुळे नीतू सिंग कपूर खूप अचंबित झाल्या.

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हर्ष आणि भारती हे जोडपे इंडियन आयडॉल १२चे पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी हजेरी लावत असतात.

बॉलिवूडमधील हे सेलिब्रेटी इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचे मनोबल वाढवतात. तसेच त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से देखील सांगतात. इंडियन आयडॉलचा हा भाग ऋषी कपूर विशेष भाग असणार आहे आणि त्यासाठी नीतू सिंग कपूर कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमातील स्पर्धक ऋषी कपूर यांची सदाबहार गाणी सादर करणार आहेत.

इंडियन आयडॉलमधील दानिश या लोकप्रिय स्पर्धकाने नीतू सिंग कपूर यांना मंचावर येऊन त्याचे आवडते गाणे ‘एक मैं और एक तू’ वर त्याच्यासोबत डान्स करण्याची गळ घातली. दानिशच्या लुक्समुळे नीतू सिंग कपूर खूप अचंबित झाल्या. कारण तो बराचसा ऋषी कपूर यांच्यासारखा दिसतो असे त्यांना वाटले. दानिशचे कौतुक करत नीतू सिंग कपूर म्हणाल्या, तू बराचसा ऋषी कपूर यांच्यासारखा दिसतोस. यावर दानिशने सांगितले, नीतू सिंग कपूर यांच्यासोबत मला इंडियन आयडॉलच्या सेटवर डान्स करायला मिळाला याचा मला आनंद होत आहे. मला हे सगळे एखाद्या स्वप्नासारखेच वाटत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neetu Kapoor finds Indian Idol 12 contestant Danishs looks similar to Rishi Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.