ठळक मुद्देमृणालने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये आपल्याला छोट्या केसांमधील मृणाल पाहायला मिळते आहे. या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.

माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे, कुटुंबियांचे फोटो पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एक फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण मृणालने तिचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.

मृणालने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये आपल्याला छोट्या केसांमधील मृणाल पाहायला मिळते आहे. या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. पण ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून देत आहेत. मृणालने लूक बदलल्यानंतर सामान्य लोकच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे, शर्मिष्ठा राऊत यांना तिचा हा लूक खूप आवडला असल्याचे त्यांनी तिला सांगितले आहे.

मराठी इंडस्ट्रीत सरळ, साधी आणि सोज्जवळ अभिनेत्री अशी मृणालची ओळख निर्माण झाली आहे. तिने तू तिथे मी, अस्सं सासर सुरेख बाई या मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. सुखांच्या सरीने हे मन बावरे या मालिकेमध्येही आपल्या भूमिकेने मृणालने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. मृणाल केवळ चांगली अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम डान्सरही आहे. तिने एकापेक्षा एक अप्सरा आली या शोमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.

25 फेब्रुवारी 2016 रोजी मृणाल अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या नीरज मोरेसह अरेंज मॅरेज पद्धतीने लग्नबंधनात अडकली. कांदेपोहेच्या कार्यक्रमात मृणाल आणि नीरज पहिल्यांदा एकमेकांना भेटले. नीरज अमेरिकेतच राहात असून मृणाल काही महिने भारतात तर काही महिने अमेरिकेत राहाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: marathi actress mrunal dusanis make over, shares pictures on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.