ठळक मुद्देतिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी काही दिवसांपासून आजरी होते. पण आदित्यने माझी खूप काळजी घेतली. त्याने माझ्या औषधांपासून खाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीं व्यवस्थिपणे पाहिल्या.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाच्या भूमिकेत रसिका सुनीलला आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेमुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. रसिका सुनील तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी काही दिवसांपासून आजरी होते. पण आदित्यने माझी खूप काळजी घेतली. त्याने माझ्या औषधांपासून खाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीं व्यवस्थिपणे पाहिल्या. तसेच माझे घर खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. त्याच्यामुळेच मी माझ्या घरातील मंडळींना मिस केले नाही. 

रसिका सुनीलने न्यू इअरच्या शुभेच्छा देत फोटोसोबत एक इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिले होते. तिने लिहिले होते की, दो हजार एक किस... २०२१ या नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा... २०२० हे अतिशय त्रासदायक वर्षं असलं तरी मी काही कारणांमुळे या वर्षाची नेहमीच ऋणी राहीन... या वर्षाची मी ऋणी असण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे तू... 

रसिकाच्या या पोस्टनंतर ती या व्यक्तीला डेट करते का अशी चर्चा सगळीकडे रंगताना दिसली होती. मात्र त्याबद्दल तिने टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत खुलासा केला होता. रसिका सुनीलने आदित्य बिलागीला डेट करत असल्याचे कबूल केले होते. तिने म्हटले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी सध्या प्रचंड खूश आहे.

आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती बसस्टॉप, गर्लफ्रेंड व गॅटमॅट चित्रपटात झळकली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Majhya Navryachi Bayko fame rasika sunil thank boyfriend aditya for taking care of her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.