या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला मेकओव्हर, या फोटोत ओळखणेही होतंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:24 PM2021-04-08T12:24:28+5:302021-04-08T12:26:51+5:30

या अभिनेत्रीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

Majhya Navryachi Bayko fame rasika sunil shares makeover picture on social media | या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला मेकओव्हर, या फोटोत ओळखणेही होतंय कठीण

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला मेकओव्हर, या फोटोत ओळखणेही होतंय कठीण

googlenewsNext
ठळक मुद्देरसिकाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. रसिकाने केस कापले असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

अभिनेत्री रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेने निरोप घेतला असला तरी रसिका सुनीलने प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते. ती सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे आणि ती पायलट झाली आहे.



रसिकाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. रसिकाने केस कापले असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू छोट्या केसांमध्ये अधिक सुंदर दिसतेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.



रसिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 17 तासांत 33 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे.

Web Title: Majhya Navryachi Bayko fame rasika sunil shares makeover picture on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.