ठळक मुद्देविराजस आणि शिवानी रांगोळे यांच्या प्रेमकथेची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे आणि आता तर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात या जोडीने एकत्र हजेरी लावली होती

माझा होशील ना ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेतील नायक विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते.

माझा होशील ना या मालिकेतील आदित्य सईच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण खऱ्या आयुष्यात विराजस एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. विराजस आणि शिवानी रांगोळे यांच्या प्रेमकथेची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे आणि आता तर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात या जोडीने एकत्र हजेरी लावली होती आणि विशेष म्हणजे या दोघांनी लग्नात कपडे देखील मॅचिंग घातलेले होते.

विराजसने नुकतेच सिद्धार्थच्या लग्नाचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात एक ग्रुप फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. पण त्याचसोबत त्याने शिवानीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. तसेच विराजसच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला शिवानी आणि त्याचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी शिवानीने दोघांचा एकत्रित फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने 'Yup' असं कॅप्शन दिलं होतं. शिवाय तिने या फोटोसोबत एक हार्ट इमोजीदेखील पोस्ट केला होता. तेव्हापासून त्या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

विराजस आणि शिवानीची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. शिवानीने विराजसच्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात काम केलं होत. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती. शिवानी सध्या 'सांग तू आहेस ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.

विराजस आणि शिवानीच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर होत असली तरी त्या दोघांनी याबाबत मौन राखणेच पसंत केले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: majha hoshil na fame virajas kulkarni in relationship with shivani rangole?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.