ठळक मुद्देसुमोनाने एका व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत हा माझा जवळचा मित्र मला अचानक मालदिवला भेटला असे तिने या फोटोसोबत लिहिले आहे.

द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमामुळे सुमोना चक्रवतीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तिने तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

सुमोनाचा एका व्यक्तीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या एका मित्राने तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सुमोना मला अचानक मालदिवला भेटली असे या फोटोसोबत लिहिले आहे. सुमोना सोबत दिसत असलेला हा व्यक्ती कोण आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. 

सुमोनासोबत दिसत असलेल्या या व्यक्तीचं नाव मोहित मुधा असून तो सुमोनाचा अनेक वर्षांपासूनचा खूप चांगला मित्र आहे. शिवाय तो एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. सुमोनाचा एक बिकिनीमधील फोटो देखील त्याने मालदिवला काढला असून सुमोनाने तो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती ही 'द कपिल शर्मा शो' मधील सर्वात जुन्या कलाकारांपैकी एक आहे. 'कॉमेडी सर्कस' मध्ये ती कपिल शर्मासोबतही होती. 'द कपिल शर्मा शो' मध्ये ती भुरीची भूमिका साकारत आहे आणि तिच्या अभिनयाची, नृत्याची, विनोदाच्या टाइमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Kapil Sharma Show's Sumona Chakravarti shares stunning picture with mysterious guy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.