ठळक मुद्देभारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे

भारती सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हि़डिओत भारती सिंगने मास्क घातलेला नाहीये. पण इतरांना ती मास्क घालण्याचे धडे देत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रचंड भडकले असून तिला चांगलेच सुनावत आहेत.

भारती सिंगच्या या व्हिडिओत ती एका माणसाला मास्क नाही घातला का असे विचारत आहे. त्यावर तिच्या लक्षात येते की, त्याने मास्क घातला आहे उलट भारतीने मास्क घातलेला नाहीये. त्यावर लगेचच ती तिचा फॉक्रचा फ्रील तोंडावर घेताना दिसत आहे. या व्हिडिओत अंकल को आपने डरा दिया (काकांना तू घाबरवलंस) असे एक फोटोग्राफर बोलताना दिसत आहे.

भारतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. तुझा नशा अजून उतरला नाही का, तू मास्क घाल... अशाप्रकारचे कमेंट लिहून तिला सोशल मीडियावर नेटिझन्स चांगलेच सुनावत आहेत. 

कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आहेत. घरात गांजा सापडल्यानंतर एनसीबीने दोघांनाही अटक केली होती. अर्थात यानंतर दोघेही जामिनावर सुटले.

ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला असली तरी लोकांच्या मनात त्यांच्या विषयी राग बघायला मिळत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Kapil Sharma Show Star Bharti Singh ‘Scared’ Man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.