ठळक मुद्देराज बब्बर यांची ही गोष्ट ऐकून कपिलला त्याच्या लग्नातील एक रंजक किस्सा आठवला. कपिलने सांगितले की, माझ्यासोबत देखील काहीसे असेच घडले होते. माझ्या लग्नात स्टेजवर अनेकजण एकत्र चढले होते. मी ते पाहून इतका घाबरलो होतो.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.आता या कार्यक्रमात जया प्रदा, राज बब्बर, गुरप्रीत गुग्गी, इहाना ढिल्लन हजेरी लावणार आहेत. या भागात कपिल शर्मा त्याच्या लग्नातील एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून उपस्थितांना हसू आवरले नाही.

कपिल त्याच्याच लग्नातून पळून गेला होता असे त्याने सांगितले. कपिल शर्माने या कार्यक्रमात राज बब्बर यांना विचारले की, तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाण्याआधी त्या कार्यक्रमाचा स्टेज मजबूत आहे का याची खातरजमा करता का? यावर राज बब्बर यांनी सागितले की, मी राजकारणात गेल्यानंतर मला पाहाण्यासाठी माझे अनेक फॅन्स माझ्या राजकीय कार्यक्रमांना येत असत. काहीजण तर थेट स्टेजवर चढत. कधी कधी स्टेजवर इतकी गर्दी होत असे की स्टेज कोसळणार नाही ना याची मला भीती वाटत असे. त्यामुळे मी स्वतः कार्यक्रम सुरू व्हायच्याआधी स्टेज मजबूत आहे का हे पाहात असे. राज बब्बर यांची ही गोष्ट ऐकून कपिलला त्याच्या लग्नातील एक रंजक किस्सा आठवला. कपिलने सांगितले की, माझ्यासोबत देखील काहीसे असेच घडले होते. माझ्या लग्नात स्टेजवर अनेकजण एकत्र चढले होते. मी ते पाहून इतका घाबरलो होतो की, मी पळतच रूममध्ये घुसलो आणि पुन्हा बाहेर पडलोच नाही. 

कपिल आणि गिन्नी चतरथचे लग्न डिसेंबर २०१९ मध्ये झाले होते. त्यांना अनायरा ही मुलगी असून ती केवळ वर्षाची आहे. गिन्नी आणि कपिलने अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kapil Sharma Ran off During His Marriage Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.