Kapil Sharma is all set for a digital debut | डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे कपिल शर्मा, इतके कोटी घेतले मानधन

डिजिटल पदार्पणासाठी सज्ज आहे कपिल शर्मा, इतके कोटी घेतले मानधन

कॉमेडी किंग म्हणून लोकप्रिय असलेल्या कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत. प्रत्येकाच्या मनात कपिल शर्माने घर केले आहे. टेलिव्हिजननंतर कपिल शर्माने चित्रपटसृष्टीत आपली ओळख बनवली आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिल शर्मा आणि द कपिल शर्मा शो सारखे हिट शो दिल्यानंतर अभिनेता कपिल शर्मा घराघरात पोहचला आहे. आता कपिल शर्मा डिजिटल माध्यमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल शर्मा लवकरच एका वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करणार आहे. मात्र कपिलच्या या प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. कृष्णा अभिषेकने मस्करीत म्हटले की, कपिल शर्मा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन सुरूवात करण्यासाठी २० कोटी रुपये मानधन घेतो आहे. मात्र असेही म्हटलं जात आहे की हे सगळं कृष्णाने मस्करीत म्हटले होते. मात्र हे ऐकून चाहते खूप हैराण झाले आहेत. मात्र ही बाब नाकारता येत नाही की कपिल शर्माने डिजिटल प्रोजेक्टसाठी जास्त मानधन घेतले असेल. द कपिल शर्मा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.


नुकतेच द कपिल शर्मा शोमध्ये महाभारतमधील कलाकार नितीश भारद्वाज, गजेंद्र चौहान आणि पुनीत इस्सर यांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून हा शो चर्चेत आला आहे. मुकेश खन्ना यांनी द कपिल शर्मा शोवर केलेल्या टीकेनंतर खूप कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. मात्र कपिल शर्माने यावर चुप्पी साधली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kapil Sharma is all set for a digital debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.