ठळक मुद्देहार्दिकचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ दोन तासांत आठ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने घराघरात पोहोचलेला राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकताच एका चिमुकल्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हार्दिकसोबत एक गोंडस बाळ दिसत असून या बाळाच्या फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, माझ्या बहिणीच्या आयुष्यात आलेल्या या चिमुकल्यासाठी मी तिचे अभिनंदन करतो. अयांश आमच्या कुटुंबात तुझे स्वागत आहे. हार्दिकचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ दोन तासांत आठ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

2015 मध्ये आलेल्या ‘रंगा पतंगा’ या सिनेमातून हार्दिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे. हार्दिक जोशीने या आधीदेखील अस्मिता, क्राइम पेट्रोल या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. शिवाय स्वप्नांच्या पलीकडले आणि दुर्वा या मालिकांमधून देखील तो प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. राणा आणि पाठकबाई यांची केमिस्ट्री व प्रेमकहाणीसुद्धा त्यांना भावली होती. हार्दिकला व्यायामाची आवड आहेच सोबतच त्याला ढोल वाजवायला देखील आवडते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: hardik joshishares picture with niece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.