Gudipadwa 2021 Disha Parmar Gets Gift From Rahul Vaidya Mother | मराठमोळ्या साडीत खुललं दिशा परमारचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त होणा-या सासूबाईंनीही दिले खास सरप्राईज

मराठमोळ्या साडीत खुललं दिशा परमारचं सौंदर्य, गुढीपाडव्यानिमित्त होणा-या सासूबाईंनीही दिले खास सरप्राईज

'बिग बॉस १४' शो मुळे गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार ही जोडी तूफान चर्चेत आली. शोमध्ये अनेकदा राहुल फक्त दिशाबद्दल बोलताना दिसायचा.राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती.अशाप्रकरे पहिल्यांच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहेत. 

 

राहुल वैद्य आणि दिशा परमार दोघांनी गुढी उभारत  नवं वर्षाचं स्वागत केल्याचे पाहायला मिळत आहे.राहुल वैद्यसाठी यंदाचा गुढीपाडवा खास आहे. कारण पहिल्यांदाच होणारी बायको दिशा परमारसह त्याने गुढीपाडवा साजरा केला. दोघांनी मिळून गुढी उभारली. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिशासह गुढीपाडवा साजरा केल्याचा आनंदा राहुल वैद्यच्या चेह-या ओसंडून वाहतोय तर दुसरीकडे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिशा परमारला तिच्या होणाऱ्या सासूकडून एक खास सरप्राईज मिळाले आहे त्यामुळे दिशाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

होणा-या सासूबाईंनी दिशाला महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी दिली आहे. त्यासोबतच एक नथदेखील भेट दिली आहे. दिशाने साडी नेसून आज गुढीपाडव्याची पूजा केली. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पहिल्यांदा गुढी उभारत सण साजरा करण्याची दिशाची ही पहिलीच वेळ असावी. त्यासंदर्भात तिने सांगितले की, एरव्ही मालिकेत काम करताना गुढी पाडव्याचे सेलिब्रेशन करायचो. पण घरी अशा प्रकारे हा सण साजरा करण्याचा पहिलाच अनुभव आहे. महाराष्ट्रीयन कुटुंबाची मी सून होणार असल्यामुळे हळहळू सगळ्या महाराष्टीयन पारंपरिक गोष्टी शिकायच्या आहेत. सगळ्यात आधी महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण बनवणायला शिकायचे आहे. खरंतर मला जेवण बनवता येत नाही. त्यामुळे माझ्या होणा-या सासूबाईंकडून मला खास महाराष्ट्रीयन स्टाइलचे जेवण बनवायला शिकायचे आहे असेही दिशाने सांगितले. 

काय सांगता ! Rahul vadiya आणि disha Parmar यांनी गुपचूप उरकले लग्न ? फोटो झालेत व्हायरल

नववधू प्रमाणे नटलेली दिशा आणि नवरदेव बनलेला राहुल वैद्य फोटोमध्ये दोघांनी लग्न केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या दोघांचे फोटो पाहून अनेकांना अश्यर्याचा धक्काच बसला आहे.लग्न करणार हे साऱ्यांना माहिती होते.पण इतक्या लवकर लग्नाचा बार उडणार याविषयी कोणतीच आयडिया नव्हती.तसेच राहुल आणि दिशा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाविषयी काहीच सांगितले नव्हते.त्यामुळे दोघांनी लग्न करत चाहत्यांना मोठे सरप्राईज आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gudipadwa 2021 Disha Parmar Gets Gift From Rahul Vaidya Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.