Gauahar khan might get married with ismail darbar son zaid darbar in november | Bigg Boss 14:अखेर गौहर खान अडकणार नोव्हेंबरमध्ये जैदसोबत लग्नबेडीत, लग्नाला इस्माइल दरबार यांची परवानगी

Bigg Boss 14:अखेर गौहर खान अडकणार नोव्हेंबरमध्ये जैदसोबत लग्नबेडीत, लग्नाला इस्माइल दरबार यांची परवानगी

संगीतकार इस्माइल दरबार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर पुढच्या महिन्यात इस्माईल दरबार सासरे होणार आहेत. 'बिग बॉस' च्या 14' व्या सीझनमुळे चर्चेत असलेली गौहर खान  आणि इस्माईलचा मुलगा जैद दरबारच्या लग्नाच्या बातमीने आदित्य नारायण आणि नेहा कक्कर यांच्या लग्नांच्या बातम्यांना मागे सोडले आहे. 

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, जैदचे वडील इस्माइल दरबार यांनी म्हणाले की, जसं मुलांना हवं आहे तसंच होईल. जर सर्व काही ठीक राहिले तर नोव्हेंबरमध्ये जैद आणि गौहर लग्न करतील. 

गौहर खान आणि जैद दरबार सोशल मीडियावर नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. जेव्हा गौरह खान 'बिग बॉस 14'मध्ये सहभागी होत होती त्यावेळी तिने इस्माइल दरबार यांचा फोनवरुन आर्शीवाद घेतला होता. त्यानंतर ती बिग बॉसच्या घरात दाखल झाली. रिपोर्टनुसार मुंबईत लग्नाची तयारी लवकरच सुरु होणार आहे. असे म्हटले जाते की इस्माईल दरबार यांना आपला मुलगा जैद यांच्या निवडीवर काहीच आक्षेप नाही, परंतु त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल काळजीपूर्वक विचार करण्याचा सल्ला आपल्या मुलाला दिला आहे. गौहर ही जैद पेक्षा मोठी आहे, याच गोष्टीमुळे वडिलांनी त्याला हा सल्ला दिला असावा.  जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gauahar khan might get married with ismail darbar son zaid darbar in november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.