Gauahar khan and zaid will get married at mumbais grand itc maratha know wedding functions details here | 'या' ठिकाणी होणार गौहर खान आणि जैद दरबारचे ग्रँड वेडिंग, प्री-वेडिंग फोटोशूट होणार पुण्यात?

'या' ठिकाणी होणार गौहर खान आणि जैद दरबारचे ग्रँड वेडिंग, प्री-वेडिंग फोटोशूट होणार पुण्यात?

बिग बॉस फेम गौहर खान सध्या आपल्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच गौहर खानने आपल्या एंगेजमेंट रिंगदेखील सोशल मीडियावर फ्लॉन्ट केली होती. गौहर आणि जैद पुढील महिन्यात 25 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत आणि तिच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

गौहर खान आणि जैदच नुकतेच दुबईला गेले होते. तिथले फोटो सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केले होते. गौहर आणि जैद मुंबईच्या ग्रँड आयटीसी मराठामध्ये लग्न करणार असल्याची बातमी समोर येते आहे. यासह प्री-वेडिंग शूट आणि इतर कार्यक्रमांची तयारीदेखील सुरू झाली आहे.


मीडिया रिपोर्टनुसार कपलने लग्नासाठी आयटीसी मराठाची निवड केली आहे. तसेच पुण्यातील जाधवगड हॉटेलमध्ये दोघे लग्नापूर्वीचे प्री-वेडिंग शूट करण्याची शक्यता आहे. गौहरचा पुण्याशी खास नातं आहे. गौहरचा जन्म पुण्यात झाला. त्यामुळेच कदाचित प्री-वेडिंग शूटसाठी गौहरने पुण्याची निवड केली असावी.  गौहर खानला लग्नाला रॉयल टच द्यायचा आहे.  25  तारखेला लग्न होणार असले तरी,  प्री-वेडिंग फंक्शन्स 22 डिसेंबरपासून सुरू होतील. गौहरने 2009मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'बिग बॉस 14'मध्ये तुफानी सिनिअर्स म्हणून गौहर दोन आठवडे घरात होती. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gauahar khan and zaid will get married at mumbais grand itc maratha know wedding functions details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.