Dayaben will come back in 'Taraq Mehta ..' in Navratri? Finally the producers broke the silence | नवरात्रीमध्ये 'तारक मेहता..'मध्ये दयाबेन करणार कमबॅक? अखेर निर्मात्यांनी तोडली चुप्पी

नवरात्रीमध्ये 'तारक मेहता..'मध्ये दयाबेन करणार कमबॅक? अखेर निर्मात्यांनी तोडली चुप्पी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्माने नुकतेच ३००० भाग पूर्ण केले. ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिशा वकानी मालिकेत पुनरागमन करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र अखेर या मालिकेच्या निर्मात्यांनी चुप्पी तोडली आहे.


तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दिशा वकानीच्या कमबॅकबद्दल सांगितले की, आता काहीच निश्चित नाही. कोईमोई डॉट कॉमशी बोलताना दिशा वकानी व तिच्या कुटुंबासोबत निगोशिएट केल्याबद्दल असित मोदी म्हणाले की, निगोशिएट असे काही होत नाही.


दिशा वकानीने मागील वर्षी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत गेस्ट अपियरेन्ससाठी शूटिंग केले होते. तिचा नवरा मयुरने सांगितले होते की, ते निर्मात्यांशी बातचीत करत होते पण तडजोड झाली नाही.

त्यांनी पिंकव्हिलाला सांगितले होते की, निर्मात्यांसोबत आमची झालेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे ती मालिकेत परतणार नाही. यावर प्रतिक्रिया देताना असित मोदी म्हणाले होते की, मला स्वीकारले पाहिजे की आपल्यामध्ये अद्याप बातचीत सुरू आहे आणि आम्ही लवकरच एका निष्कर्षावर पोहचू अशी आशा करतो. आम्ही महिन्याभरापासून दिशासोबत बातचीत करतो आहे. जसे मी आधी सांगितले की कोणीच मालिकेपेक्षा मोठा नसतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dayaben will come back in 'Taraq Mehta ..' in Navratri? Finally the producers broke the silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.