सागर कारंडेच्या कुटुंबियांचा फोटो पाहिला का? पत्नी दिसते खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 03:27 PM2021-04-15T15:27:15+5:302021-04-15T15:30:20+5:30

सागर कारंडेचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

chala hawa yeu dya fame sagar karande family picture | सागर कारंडेच्या कुटुंबियांचा फोटो पाहिला का? पत्नी दिसते खूपच सुंदर

सागर कारंडेच्या कुटुंबियांचा फोटो पाहिला का? पत्नी दिसते खूपच सुंदर

googlenewsNext
ठळक मुद्देचला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले.

सागर कारंडे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकतेच त्याने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना त्याच्या कुटुंबियांचा फोटो पोस्ट केला आहे. यात आपल्याला त्याच्या पत्नीला आणि मुलीला पाहायला मिळत आहे.

सागर कारंडेचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सात हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. 

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता. पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती. नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.

सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे की, प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले. चलाहवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

Web Title: chala hawa yeu dya fame sagar karande family picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.