चला हवा येऊ द्या अंकुर वाढवेला झाली मुलगी, बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 02:35 PM2021-01-18T14:35:33+5:302021-01-18T14:36:34+5:30

अंकुरने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलाचा फोटो शेअर करून त्यासोबत लिहिले आहे की, कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो.

Chala Hawa Yeu Dya fame ankur wadhave blessed with baby girl | चला हवा येऊ द्या अंकुर वाढवेला झाली मुलगी, बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

चला हवा येऊ द्या अंकुर वाढवेला झाली मुलगी, बाळाचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देअंकुरने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलाचा फोटो शेअर करून त्यासोबत लिहिले आहे की, कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो. या पोस्टसोबत अंकुरने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

थुकरटवाडीतील प्रत्येक विनोदवीर रसिकांचे धम्माल मनोरंजन करत असतो. कॉमेडीचे भन्नाट टायमिंग आणि धम्माल मस्ती यामुळे चला हवा येऊ द्या हा शो तुफान लोकप्रिय ठरला आहे. कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम आणि श्रेया बुगडे रसिकांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. रसिकांना ते पोटधरून हसवतात. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा तसंच त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता अंकुर गाढवेचाही यात समावेश आहे.

अंकुर वाढवेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. अंकुर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याला गोंडस मुलगी झाली असून त्यानेच सोशल मीडियाद्वारे ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. अंकुरने इन्स्टाग्रामवर त्याच्या मुलाचा फोटो शेअर करून त्यासोबत लिहिले आहे की, कालच्या दिवशी मी नवीन पात्रात प्रवेश केला आता एका मुलीचा बाप झालो. या पोस्टसोबत अंकुरने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.  त्याच्या या फोटोवर त्याचे फॅन्स भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. अगदी त्याच प्रमाणे अंकुर वाढवे या कलाकारावरही रसिक भरभरून प्रेम करतात. याच शोने अंकुरला ओळख मिळवून दिली. २८ जून २०१९ ला अंकुरचा विवाह पार पडला. कोर्ट मॅरेज करत त्याने त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली होती. अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स आणि कन्हैया या नाटकात काम केले आहे.

Web Title: Chala Hawa Yeu Dya fame ankur wadhave blessed with baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.