छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉस १४ मागील सीझनप्रमाणे हिट बनवण्यासाठी निर्माते धडपडत आहेत. या सीझनमध्ये मागील सीझनचे लोकप्रिय कंटेस्टंट सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांना सहभागी केले आहे. दरम्यान आता बिग बॉसच्या घरात एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे.

बिग बॉस १४मध्ये पहिल्या आठवड्यानंतर स्पर्धक सारा गुरपाल बाहेर पडली. त्यानंतर पवित्रा पुनिया, एजाज खान आणि शहजाद देओल यांनादेखील बाहेरचा रस्ता दाखवल्याचे समजते आहे. त्यांच्या एलिमिनेशननंतर आता बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

आतापर्यंत नैना सिंग, शार्दुल पंडित, रश्मी गुप्ता, प्रतीक सहजपाल आणि सपना सप्पू यांचे नाव वाइल्ड कार्ड एन्ट्रीसाठी समोर आले होते. मात्र स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, या लोकांच्या आधी घरात कविता कौशिक वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे.


बिग बॉस १४ साठी कविता कौशिकचे नाव बऱ्याच कालावधीपासून चर्चेत होते. पण प्रीमियर एपिसोड जेव्हा ती दिसली नाही तेव्हा वाटलं की ती बिग बॉस १४मध्ये दिसणार नाही. मात्र आता ती शोमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

असे वाटतंय की कविता कौशिकला बिग बॉसच्या घरात येण्यासाठी तयार केले आहे. मात्र अद्याप कविताकडून काहीच स्टेटमेंट आले नाही. रिपोर्टनुसार, वाइल्ड कार्ड एन्ट्री शिवाय या महिन्याच्या शेवटी आणखी काही नवीन चेहरे बिग बॉस १४मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14: Kavita Kaushik will make a wild card entry in the house of Bigg Boss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.