bigg boss 14 kavita kaushik husband ronnit biswas reveals shocking things about abhinav shukla | Bigg Boss 14 : अभिनव शुक्ला दारूच्या नशेत माझ्या पत्नीला...! कविता कौशिकच्या पतीचा शॉकिंग खुलासा

Bigg Boss 14 : अभिनव शुक्ला दारूच्या नशेत माझ्या पत्नीला...! कविता कौशिकच्या पतीचा शॉकिंग खुलासा

ठळक मुद्देकविताने रूबीनासमक्ष अभिनवबद्दल एक खुलासा केला होता. अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो, असे ती म्हणाली होती. हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता.

‘बिग बॉस 14’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या अखेरच्या टप्प्यात आहेत. फिनालेला काही दिवस उरले असतानाच बिग बॉसच्या घरातील स्पर्धक रूबीना दिलैक आणि कविता कौशिक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. दोघींमधील वाद इतकात विकोपाला गेले की, कविता थेट बिग बॉसच्या घराबाहेर पडली. कविता बिग बॉसच्या घराबाहेर पडताच, तिचा पती रोनित  बिस्वासने काही शॉकिंग खुलासे केले आहेत. हे खुलासे कोणाबद्दल तर रूबीनाचा पती अभिनव शुक्लाबद्दल.
होय, रोनितने काही ट्वीट केलेत. या ट्वीट्समध्ये त्याने अभिनवचे थेट नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा अभिनवकडे आहे, हे स्पष्ट आहे.

पहिल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले, ‘मी आता येथे सत्य सांगतोय. तो इतका जेंटलमॅन पण नाहीये. मी ज्याच्याबद्दल बोलतोय, त्याला अल्कोहोलचे प्रचंड व्यसन आहे. दारूच्या नशेत तर्र होऊन तो कविता कौशिकला रात्रभर मॅसेज करायचा. माझ्याशी बोल म्हणत  त्रास द्यायचा आणि चुकीच्या वेळी भेटायला बोलवायचा. तो तिला इतका त्रास द्यायचा की, अनेकदा तिने पोलिसांनाही बोलावले आहे.’


कविताचा पती रोनित इथेच थांबला नाही तर त्याने आणखी एक ट्वीट केले. यात त्याने एका जुन्या गोष्टीचा खुलासा केला. ‘हा तोच माणूस आहे, ज्याने आपल्या सिनेमासाठी आमचे घर मागितले. तो सिनेमा जो आम्ही फ्रीमध्ये केला होता आणि आमचे घरही दिले होते. कारण तो स्वत:च्या घरात शूट करू शकत नव्हता. आता हाच माणूस या महिलेला मारायची भाषा करतो. तू मर्द आहेस? खरंच??’, असे रोनितने लिहिले आहे.

Bigg Boss 14: या सीझनमधील दुसऱ्या फायनलिस्टचे नाव आले समोर, एजाज खानला देणार टक्कर

अलीच्या विरहात जास्मीन भसीन रात्रभर रडली अन् कोरोना टेस्ट करावी लागली!!

एका टास्कमध्ये अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताचा राग अनावर झाला होता.  अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही,असे कॅमे-यापुढे म्हणत कविनाने पुढे टास्क करण्यास नकार दिला होता. यादरम्यान कविताने रूबीनासमक्ष अभिनवबद्दल एक खुलासा केला होता. अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो, असे ती म्हणाली होती. हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bigg boss 14 kavita kaushik husband ronnit biswas reveals shocking things about abhinav shukla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.