ठळक मुद्देअनुपमा या मालिकेतील पारुल चौधरीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून तिची तब्येत खालावली आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशात आली असून दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता तर एका अभिनेत्रीला दुसऱ्यांदा कोरोना झाला असून तिला प्रचंड त्रास होत असल्याचे तिने सांगितले आहे.

अनुपमा या मालिकेतील पारुल चौधरीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली असून तिची तब्येत खालावली आहे. ती सांगते, मला सहा महिन्यांपूर्वी एका वेबसिरिजचे चित्रीकरण करायचे होते. त्यासाठी मी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यावेळी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पण त्यावेळी माझ्यात कोणतीही कोरोनाची लक्षणं नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून माझे डोकं खूप दुखत आहे तसेच अंग दुखत आहे. मला कसलीही टेस्ट येत नाहीये, तसेच कसलाही वास येत नाही. तसेच जुलाब होत आहे. त्यामुळे माझ्यात त्राणच उरलेला नाहीये. कोरोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली असून मी होम क्वांरंटाईन आहे. 

तिने पुढे सांगितले की, माझे आई-वडील, बहीण यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सगळ्यांवरच उपचार सुरू आहेत. आमचे फ्रेंड्स आम्हाला मदत करत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anupama fame Parul Chaudhary tests Covid positive again with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.