अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. जूनमध्ये अशी बातमी आली आहे की दोघांनी साखरपुडा केला आहे आणि लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती विक्की जैनसोबत दिसते आहे. हा व्हिडीओ अंकिता-विक्कीच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आला होता. फॅन पेजवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ अंकिताने आपल्या इन्स्टा स्टोरीवर ठेवला आहे. 


फॅनने बनवली व्हिडीओ क्लिप 
अंकिता लोखंडे सुशांत सिंग राजपूतसोबत 6 वर्षे रिलेशनशीपमध्ये होती. 2016मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विक्की आला. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नेहमीच व्हायरल होत असतात. अंकिताच्या फॅन पेजवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात अंकिता आणि विक्की जैनची काही रोमाँटिक फोटो आहेत.  अंकिताने व्हिडीओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. 


अंकिता लोखंडेच्या डान्स व्हिडीओ झाला व्हायरल 
अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून  शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अंकिता ग्रीन साडीमध्ये नाचताना दिसली होती. 'हवा के झोंके' गाण्यावर तिने जबरदस्त ठेका धरला होता.  या व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे खूपच सुंदर दिसत होती.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita lokhande vicky jain romantic video clip on fans instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.