अमृताला 'या' गोष्टीशी कनेक्ट रहायला खूप आवडते, वाचल्यावर तुम्हालाही वाटेल कौतुक!

By गीतांजली | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:00+5:30

अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

Amrita khanvilkar like to connect with her fan via social media | अमृताला 'या' गोष्टीशी कनेक्ट रहायला खूप आवडते, वाचल्यावर तुम्हालाही वाटेल कौतुक!

अमृताला 'या' गोष्टीशी कनेक्ट रहायला खूप आवडते, वाचल्यावर तुम्हालाही वाटेल कौतुक!

googlenewsNext

अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता खानविलकर मलंग या बहुचर्चित सिनेमात देखील दिसली होती. लवकरच ती 'खतरों के खिलाडी 10'मध्ये दिसणार आहे. याशोबाबत तिच्याशी साधलेले हा खास संवाद. 


तुझा 'खतरों के खिलाडी 10' संपूर्ण प्रवास कसा होता ?
मला नेहमीच या शोचा भाग होण्याची फार इच्छा होती आणि अखेर ती संधी मला मिळाली. शोमधली स्पर्धकांची एकमेकांसोबत मस्त केमिस्ट्री जमली होती. बल्गेरियामध्ये शूट करताना आम्हाला खूपच मजा आली. पैसे देऊनसुद्धा तुम्ही हे स्टंट, हे थ्रील अनुभवू शकत नाही. एखादा स्टंट करताना तुम्ही 100 % देता त्याक्षणाला तुम्ही सगळ विसरता. एकंदरीत माझा संपूर्ण प्रवास खूपच सुंदर होता. 


'बल्गेरिया'मध्ये स्टंट करताना काय आव्हान आली तुला ?
आम्ही जेव्हा बल्गेरियामध्ये स्टंट शूट करत होता त्यावेळी थंडी नव्हती. आम्ही 45 डिग्रीमध्ये शूट केलं आणि मला थंडी नाही सहन होत, पण मला उन्ह 50 डिग्रीपर्यंतसुद्धा चालते. त्यामुळे माझ्यासाठी हे सोनं पे सुहागा होतं. पाण्यातील स्टंट करताना थंडीत कुडकुडण्यापेक्षा गरमी परवडली. हे स्टंट जे आम्ही केले त्यावेळी संपूर्ण टीमने आमची खूप काळजी घेतली. जे स्टंट तुम्हाला शोमध्ये बघायला मिळातील ते कृपया कोणी घरी प्रयत्न करु नका करण्याचे कारण हे स्टंट करताना आमच्या सुरक्षेची खूप काळजी घेतली गेली होती.रोहित शेट्टी आम्हाला खूप प्रोत्साहन द्यायचे.माझ्याशी तर ते मराठीतच बोलायचे.  


सगळ्यात कठीण टास्क तुझ्यासाठी कोणता होता, जो करताना तुला भीती वाटली ?
सध्या माझा आणि धर्मेशचा प्रोमोमध्ये जो हेलिकॉप्टरचा शॉर्ट सुरु आहे तो होता. लांबून खूप छान वाटतोय पण जवळ गेल्यानंतर पाहिले ते 28 सीटर्स हेलिकॉप्टर होते, त्याच्या मागची जी नेट होती ती जोरजोरात हलत होती. थँक्स तो धर्मेश त्याने या स्टंटमध्ये माझी खूप छान साथ दिली. हा स्टंट पूर्ण केल्यानंतर मी पाण्यात अक्षरक्ष: ओरडत होते. 


सोशल मीडियावर ती खूप नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते, अभिनेत्री म्हणून तुला याचा किती फायदा होता ?
मला या गोष्टीचा बराच फायदा होतो. मला माझ्या फॅन्सशी कनेक्ट राहिला खूप आवडते. आजच्या घडीला सोशल मीडिया सारखं माध्यम नाही. एक अभिनेत्री म्हणून मला या गोष्टीचा खूप फायदा आतापर्यंत झाला आहे. 


तुझ्या आगामी प्रोजेक्टबाबत काय सांगशील ?
आता 'चोरीचा मामला', मलंग येऊन गेला. आता दोन महिने हा शो आहे. त्यामुळे मी आता जर ब्रेक घेणार आहे. अजून दोन सिनेमे तुमच्या भेटीला येणार आहेत. लवकरच मी हिंदीत सुद्धा दिसेन. पण याबाबत जास्त माहिती मी आता देऊ शकत नाही.  

Web Title: Amrita khanvilkar like to connect with her fan via social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.