ठळक मुद्देअमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जे कपडे घालतात, त्याची किंमत तब्बल दहा लाख रुपये असतात. ते प्रत्येक भागात वेगवेगळे कपडे परिधान करतात. हे कपडे खास फॅशन डिझायनरकडून डिझाईन करून घेतले जातात.

अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. अमिताभ आणि कौन बनेगा करोडपती यांचे नाते खूपच खास आहे. कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे फॅन्स अमिताभ यांच्याशिवाय या कार्यक्रमाचा विचार देखील करू शकत नाही. अमिताभ यांची या कार्यक्रमात बोलण्याची पद्धत, लोकांसोबत ते ज्याप्रकारे वागतात हे सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमात ते घालत असलेल्या कपड्यांची अनेकवेळा सोशल मीडियावर चर्चा रंगते. त्यांच्या स्टाईलच्या तर लोक नेहमीच प्रेमात असतात. तुम्हाला माहीत आहे का, अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील प्रत्येक भागात किती महागडे कपडे घालतात.

अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जे कपडे घालतात, त्याची किंमत तब्बल दहा लाख रुपये असतात. ते प्रत्येक भागात वेगवेगळे कपडे परिधान करतात. हे कपडे खास फॅशन डिझायनरकडून डिझाईन करून घेतले जातात. 

अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण केले. पण त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून रिटायर्ड होत आहेत का असा प्रश्न या कार्यक्रमाच्या चाहत्यांना पडलेला आहे.

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागासाठी चित्रीकरण केल्यानंतर त्यांच्या ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते की, मी आता थकलेलो आहे आणि रिटायर झालोय... मी तुमच्या सगळ्यांची माफी मागू इच्छितो... कौन बनेगा करोडपतीच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण खूपच लांबले... मात्र हे लक्षात ठेवा की काम तर काम असतं आणि ते तन्मयतेने करायला हवं. शुटींगच्या शेवटच्या दिवशी फेअरवेलच्या निमित्ताने खूप सारं प्रेम मिळालं. शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. इच्छा हीच आहे की, कधीच थांबायचे नाही, सतत चालत रहायचे.आशा आहे की हे सगळं पुन्हा होईल. सेटवर सगळ्यांनी कायमच माझी काळजी घेतली. अनेक महिन्यांपासून सगळे जण एकत्र होतो. ते क्षण कायम आठवणीत राहतील. कौन बनेगा करोडपतीच्या क्रू मेंबर आणि सर्व टीमचे आभार.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: amitabh bachchan wear worth rupess 10 lakh suit in kaun banega crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.