‘कुछ कुछ होता है’ची मिस ब्रिगेंजा म्हणजेच अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी हे इंडस्ट्रितील यशस्वी कपल पैकी एक आहे. अर्चनाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. 30 जून 1992 मध्ये अर्चनाने परमीत सेठीसोबत लग्न केले. पण तुम्हाला ही माहिती आहे का, की हे अर्चनाचे हे दुसरे लग्न होते. प्रेमावरुन अर्चनाचा विश्वास उठला होता. त्यानंतर तिच्या आयुष्यात परमीत सेठीची एंट्री झाली.अर्चना आणि परमीत यांची प्रेमकथा देखील खूपच इंटरेस्टिंग आहे.

अर्चनाने अभिनेता आदित्य पांचोलीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर नसीरूद्दीन शहा यांच्यासोबत ‘जलवा’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आशिक आवारा, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांत काम केले.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अर्चनाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ‘बँड ऐड’ची तिची जाहिरात बघूनच तिला ‘मिस्टर अँड मिसेज’ टीव्ही मालिका मिळाली. 1985 मध्ये आलेली दिग्दर्शक पंकज पाराशर यांची ‘करमचंद’ ही मालिका अर्चनाच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरली. त्यानंतर तिने अनेक मालिका, शोजमध्ये अभिनेत्री आणि प्रेझेंटर म्हणून काम केले.

अर्चनाचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. यामुळे अर्चनाने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा परमीत तिच्या आयुष्यात आला आणि सगळेच बदलले. एका पार्टीत अर्चना व परमीत पहिल्यांदा भेटले होते. पार्टीत अर्चना मॅगझिन वाचत होती. परमीत तिच्याजवळ गेला आणि तिची मॅगझिन जोरात खेचली. अर्चना यामुळे जाम संतापली. पण लगेच सॉरी म्हणून परमीतने तिची समजूत काढली. खरे तर परमीतने जाणीवपूर्वक असे केले होते. कारण त्याना अर्चनाशी मैत्री करायची होती. या पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे परमीतचा केअरिंग स्वभाव बघून अर्चना त्याच्या प्रेमात पडली. एकमेकांना डेट करत असताना परमीत दररोज अर्चनाला प्रपोज करण्यासाठी तीन गुलाब घेऊन जायचे आणि तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे.

परमीत व अर्चना लग्नापूर्वी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यामुळे खुश नव्हते. पण अर्चना व परमीत यांचे प्रेम सच्चे होते. चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर 30 जून 1992 रोजी त्यांनी लग्न केले. सध्या अर्चना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जजची भूमिका साकारते आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actress Archana puran Singh fell in love with Parmeet Sethi after her first marriage broke up.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.