Actor Karan Bendre on the small screen crossed the sugarplum, the photo came in front | छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

छोट्या पडद्यावरील आणि रंगभूमीवरील अभिनेता करण बेंद्रेने कॉलेजची मैत्रीण निकीता नारकर सोबत नुकताच मुंबईत साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला कुटुंबातील जवळचे व्यक्ती आणि मित्रमंडळी उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला सिनेइंडस्ट्रीतील कलाकार प्रताप फड, ऋतुजा बागवे आणि अनघा भगरे उपस्थित होते. 

करण बेंद्रेने आपली कॉलेजची मैत्रीण निकिता नारकरचा २५ ऑक्टोबरला एंगेजमेंट पार पडली. त्याच्या साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
करण आणि निकिता यांची ओळख कॉलेजमधील नाटकांपासून झाली. पुढे त्यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. निकीताला ऍक्टिंगची आवड नसली तरी सध्या ती कुलाबा येथील इंडियन नेव्हीतील एचआर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. 


करण आणि निकिता ३० नोव्हेंबरला लग्न करणार आहे. लग्नाची तारीख ठरली असल्याने आगामी प्रोजेक्ट लग्नानंतरच हाती घेणार असल्याचे करणने स्पष्ट केले आहे. 
करण बेंद्रेने ८ वर्षाच्या कारकिर्दीत हिंदी मराठीतील जवळपास ३० एकांकिका साकारून त्याने अनेक बक्षिसे पटकावले आहेत.

लगी तो छगी, दोस्तीयारी, हादसा, श्री राम समर्थ अशा हिंदी मराठी चित्रपटात तसेच झी युवावरील प्रेम पोईजन पंगा या मालिकेतून त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Actor Karan Bendre on the small screen crossed the sugarplum, the photo came in front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.