'आई कुठे काय करते'मधील आप्पांवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्यामुळे मालिकेपासून होते दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:30 PM2021-05-06T13:30:25+5:302021-05-06T13:31:49+5:30

समृद्धी निवासमधील आप्पा म्हणजे किशोर महाबोले गेल्या कित्येक दिवसांपासून मालिकेत दिसत नाहीयेत.

aai kuthe kay karte appa aka kishor mahabole lost his father | 'आई कुठे काय करते'मधील आप्पांवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्यामुळे मालिकेपासून होते दूर

'आई कुठे काय करते'मधील आप्पांवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्यामुळे मालिकेपासून होते दूर

Next
ठळक मुद्देआप्पा यांचा भाऊ आजारी असल्याने ते त्याला भेटायला गेले असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. पण आता अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याच्या निमित्ताने ते मालिकेत परतणार आहेत.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेतील एखादी जरी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मालिकेत दिसली नाही तर ते आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेला मिस करतात. 

समृद्धी निवासमधील आप्पा म्हणजे प्रेक्षकांचे प्रचंड लाडके आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना त्यांना मालिकेत पाहाता येत नाहीये. आप्पांच्या भूमिकेत आपल्याला किशोर महाबोले यांना पाहायला मिळत आहे. किशोर मालिकेत दिसत नसल्याने त्यांची तब्येत बरी नाहीये का, की त्यांच्या खाजगी आयुष्यात काय घडले आहे का, असे विविध प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेले आहेत. किशोर यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मालिकेचे चित्रीकरण करत नाहीयेत.

आप्पा यांचा भाऊ आजारी असल्याने ते त्याला भेटायला गेले असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. पण आता अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याच्या निमित्ताने ते मालिकेत परतणार आहेत. 

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे. अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर आता त्याच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होणार आहे. अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aai kuthe kay karte appa aka kishor mahabole lost his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app