Reliance Jio ला पछाडलं; Airtel ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

By जयदीप दाभोळकर | Published: January 28, 2021 03:53 PM2021-01-28T15:53:06+5:302021-01-28T15:54:48+5:30

'या' शहरात सेवा केली लाईव्ह

Airtel announces 5G ready network in Hyderabad tested service commercially beore reliance jio | Reliance Jio ला पछाडलं; Airtel ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

Reliance Jio ला पछाडलं; Airtel ठरलं देशातील पहिलं 5G रेडी नेटवर्क

googlenewsNext
ठळक मुद्दे4G स्पेक्ट्रमच्या मदतीनं 5G सेवांना केली सुरूवातद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह

देशात 5G सेवा सुरू करण्याच्या बाबतीत एअरटेलनंरिलायन्स जिओला पछाडलं आहे. भारती एअरटेलनं एका कमर्शिअल नेटवर्कवर लाईव्ह 5G ची यशस्वी चाचणी केली. अशी चाचणी करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने 1800 मेगाहर्ट्झ बँडमध्ये एनएसए (नॉन स्टँड अलोन) नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे विद्यमान लिबरलाइज्ड स्पेक्ट्रमद्वारे ही सेवा लाईव्ह केली. 

आपल्याच प्रकारच्या डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरिंगचा वापर करत एअरटेलनं त्याच स्पेक्ट्रम ब्लॉकमध्ये 5G आणि 4G ची सेवा एकत्रितरित्या सुरू केली. दरम्यान, 5G सेवा रेडिओ, कोअर आणि ट्रान्सपोर्ट या सर्व डोमेनसाठी कम्पॅटिबल असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एरटेलनं हैदराबादमध्ये कमर्शिअली 5G सेवा लाईव्ह केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी Airtel 5G रेडी नेटवर्कची घोषणा केली. 5G स्पेक्ट्रम अलॉटमेंटनंतर ट्रू 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. तसंच कंपनीकडे 5G रेडी इकोसिस्टम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

कमर्शिअलची चाचणी करणारं आपलं पहिलं नेटवर्क आहे, असा दावा एअरटेलनं केला आहे. कंपनीची 5G ची सेवा ही 4G च्या तुलनेत १० टक्के अधिक वेगवान असणार आहे. कंपनीनं याची हैदराबादमध्ये चाचणी घेतली असून पूर्ण मुव्ही अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड केली जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. तसंच 5G सेवेमध्ये 3Gbps पर्यंतचा स्पीड मिळू शकतो. कंपनी स्पेक्ट्रमच्या लिलावांतर 5G सेवा त्वरित सुरू करण्याची शक्यता आहे. हैदराबादमधील माधवपूर येथे कंपनी आपल्या 5G सेवेचा डेमोही देत आहे. युझरना या ठिकाणी ही सेवा किती वेगवान आहे हे पाहता येणार आहे.

Web Title: Airtel announces 5G ready network in Hyderabad tested service commercially beore reliance jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.