मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार

By Appasaheb.patil | Published: April 12, 2019 01:52 PM2019-04-12T13:52:09+5:302019-04-12T13:56:05+5:30

सोलापूर लोकसभेसाठी गुरूवार १८ तर माढा लोकसभेसाठी मंगळवार २३ एप्रिल रोजी होणार मतदान

Weekend of 52 villages in Solapur and Madha constituencies will be closed on voting day | मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार

मतदानादिवशी सोलापूर, माढा मतदारसंघातील ५२ गावातील आठवडा बाजार बंद राहणार

googlenewsNext
ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघात १० मार्च रोजीपासून आचारसंहिता सुरू करण्यात आली जिल्ह्यातील ५२ गावातील आठवडी बाजार तात्पुरता बंद ठेवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलाकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी घेतला निर्णय

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे़  मतदानादिवशी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील ५२ गावातील आठवडी बाजार तात्पुरता बंद ठेवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांनी दिला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात १० मार्च रोजीपासून आचारसंहिता सुरू करण्यात आली़ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांकडून मतदानादिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून मतदान प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी यासाठीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना देण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने सोलापूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार १८ एप्रिल रोजी व माढा लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने जिल्ह्यातील आठवडी बाजार भरवू नये, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

या गावातील आठवडा बाजार बंद असणार 
- बीबीदारफळ (उत्तर सोलापूर), मुस्ती, आहेरवाडी (दक्षिण सोलापूर). कडबगाव स्टेशन, काझीकणबस, तडवळ  (अक्कलकोट)़ खर्डी, शेटफळ, रांझणी, बोहाळी, पंढरपूर, भंडीशेगाव, शेळवे, करोळे, नांदोरे, आंबे, खरसोळी,  (पंढरपूर)़ मंगळवेढा, पाटखळ, भोसे, हुन्नूर, रड्डे, बोराळे, सिद्धापूर, मरवडे, निंबोणी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, शिरसी, गोणेवाडी, नंदेश्वर, लवंगी, हुलजंती, सलगर बु, (ता़ मंगळवेढा)़ कटफळ, महिम, वाकीशिवणे, उदनवाडी, सोनंद, पाचेगाव बु, बलवडी, य़ मंगेवाडी, वाकी घेरडी (ता़ सांगोला)़ बेंबळे, पिलीव, रोपळे (क)़ अनगर, घोडेश्वर, खंडाळी (ता़ मोहोळ), वरकुटे, सालसे (ता़ करमाळा) या बाजारांचा बंदमध्ये  सामावेश असणार आहे. बाजार बंद असल्याने व्यापारी आणि ग्राहकांना मतदान करणे सोयीचे होणार आहे.

Web Title: Weekend of 52 villages in Solapur and Madha constituencies will be closed on voting day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.