शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:30 IST2024-11-06T14:33:17+5:302024-11-06T15:30:00+5:30

उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

Uddhav Thackeray The meeting will be held in Sangola vs shahaji patil | शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा

शहाजीबापू पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; सांगोल्यात होणार सभा

Uddhav Thackeray ( Marathi News ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. सोलापुरात होत असलेल्या सभेची तयारी सुरू झाली असून, पक्षाचे उमेदवार व महाविकास आघाडीमधील नेत्यांना सभेचे आमंत्रण देण्यात येत आहे. दरम्यान, रविवार १० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता सांगोला येथे ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते सोलापुरातील एका हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.

याशिवाय मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता धाराशिव व सायंकाळी ७ वाजता बार्शी येथे जाहीर सभा घेऊन पुन्हा ते सोलापुरात मक्काम करणार आहेत.

आघाडीतील नेत्यांशी संवाद 

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडी उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे विविध पातळीवर डावपेच आखणार आहेत. दोन दिवसांच्या सोलापुरात मुक्कामात हे डावपेच ठरणार आहे. याशिवाय महाविकास आघाडीमधील प्रमु‌ख नेत्यांशी ठाकरे हे संवाद साधणार असल्याचे सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray The meeting will be held in Sangola vs shahaji patil