लक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 14:40 IST2020-09-19T14:39:57+5:302020-09-19T14:40:03+5:30

लऊळ येथील घटना; कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल

Theft at Lakshmi temple; Two and a half kilos of silver, eight weights of gold, the idol of the goddess disappeared | लक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब

लक्ष्मी मंदिरात चोरी; सव्वा दोन किलो चांदी, आठ तोळे सोने, देवीची मुर्ती गायब

कुर्डूवाडी : लऊळ (ता.माढा) येथील डिकोळे गल्लीतील लक्ष्मी मंदिराचा दरवाजा हत्याराने तोडून ६ लाखांचा ऐवाज लंपास केला आहे. त्यात सव्वा दोन किलो चांदी व आठ तोळे सोने व  देवीची मुर्ती याचा समावेश आहे.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी  मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी कुर्डुवाडी पोलीस दाखल झाले असून तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

Web Title: Theft at Lakshmi temple; Two and a half kilos of silver, eight weights of gold, the idol of the goddess disappeared