‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार
By राकेश कदम | Updated: April 11, 2024 18:48 IST2024-04-11T18:47:47+5:302024-04-11T18:48:54+5:30
साेलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या साेलापूर आणि माढा लाेकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केली आहे. ...

‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार
साेलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या साेलापूर आणि माढा लाेकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निश्चित केली आहे. माढ्याचे उमेदवार रमेश बारसकर शुक्रवार, १२ एप्रिल राेजी तर लापूरचे उमेदवार राहूल गायकवाड साेमवार, १५ एप्रिल राेजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची अर्ज भरण्याची तयारी अद्याप निश्चित झालेली नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सांगितले.
साेलापूर आणि माढा लाेकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची साेय करण्यात आली आहे. साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील काॅंग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे १८ एप्रिल राेजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते १६ एप्रिल राेजी अर्ज दाखल करणार आहेत. या दाेन्ही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल करण्याचे नियाेजन सुरू केले आहे. एमआयएमचा साेलापूरचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.