सांगोल्याजवळ विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 16:20 IST2019-11-20T16:17:56+5:302019-11-20T16:20:41+5:30
जुनोनी गावाजवळील घटना; दोन पिकअप ट्रकची समोरासमोर धडक, पोलीस घटनास्थळी दाखल

सांगोल्याजवळ विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी
ठळक मुद्दे- दोन पिकअप ट्रकची समोरासमोर धडक- दुचाकीस्वार मध्येच आल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू- अपघातस्थळी पोलीसांचे पथक दाखल
सोलापूर/ सांगोला : सांगोला रोडवरून येणाºया व मिरज रोडवरून येणाºया दोन्ही पिकअपची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार मध्येच आल्याने दुचाकीवरील दोघांचा तर पिकअपमधील एकाचा अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, हा अपघात सांगोला- मिरज रोडवर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी मिरज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर सांगोला-मिरज मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...