सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 22, 2024 15:04 IST2024-04-22T15:03:29+5:302024-04-22T15:04:43+5:30
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १० हून अधिक उमेदवार आपले अर्ज मागे घेतले आहे.

सोलापूर : 'वंचित'चे राहुल गायकवाड यांची निवडणुकीतून माघार
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 'वंचित'चे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. सोमवार, २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १० हून अधिक उमेदवार आपले अर्ज मागे घेतले आहे.
अर्ज मागे घेण्यासाठी महसूल भवनसमोर उमेदवारांची गर्दी आहे. 'वंचित'चे उमेदवार गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 'वंचित' मध्ये खळबळ उडाली आहे. आम्हाला विश्वासात न घेता गायकवाड यांनी अर्ज मागे घेतला आहे, असा आरोप पदाधिकारी करत आहेत.