जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक
By Appasaheb.patil | Updated: June 4, 2024 17:51 IST2024-06-04T17:50:48+5:302024-06-04T17:51:51+5:30
Solapur Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक
पंढरपूर : खासदार रणजितसिंह निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, श्रीकांत भारती हे सकाळी उठल्यापासून सागर बंगल्यावर अंगारा घेऊन फिरायची. ते नेत्यांवर जादू करण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी जनतेबरोबर कधी संबंध ठेवला नाही, मात्र ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पडीक असायची अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुढे मोहिते पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले आहे. यामुळे मी विजयी झालो आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी उद्यापासून कामाला लागणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्याबरोबर जनतेवर उमेदवार लादू नका अशी वरिष्ठांकडे मागणी केली होती. परंतु कागदोपत्री कामे करणाऱ्याचे नाव पहिल्या यादीत होता. आणि लोकांचे कामे करणारे, सगळ्याला मदत करणारे नितीन गडकरी सारखे ज्येष्ठ नेत्याचे नाव चौथ्या यादीत होते अशी खंत मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.