धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; अकलूज शहरात लागले खासदारकीचं बॅनर

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 03:19 PM2024-06-04T15:19:00+5:302024-06-04T15:19:26+5:30

Solapur Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना ११ व्या फेरी अखेर ३८ हजार २१५ मतांची आघाडी मिळाली आहे.

solapur lok sabha election result 2024 dhairyasheel mohite patil towards victory maharashtra live result | धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; अकलूज शहरात लागले खासदारकीचं बॅनर

धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; अकलूज शहरात लागले खासदारकीचं बॅनर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांना ११ व्या फेरी अखेर ३८ हजार २१५ मतांची आघाडी मिळाली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा मार्ग विजयाच्या दिशेने जात असून अकलूज शहरात खासदारकीचे बॅनर दुपारपासूनच झळकू लागले आहेत.

दरम्यान, ११ व्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांना २ लाख ६७ हजार ६४३ मते मिळाली आहेत. तर भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना २ लाख २९ हजार ४२८ मते मिळाली आहेत. ११ व्या  फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील हे ३८ हजार २१५  मतांनी पुढे आहेत. पहिल्या फेरीपासूनच धैर्यशील हे आघाडीवर होते. माढा लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदारसंघात निंबाळकरांना चांगले मताधिक्क मिळाले नाही. माण, खटाव, फलटण, माळशिरस, करमाळा, माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटलांना चांगले मताधिक्क मिळाले आहे. अकलूज शहरात धैर्यशील मोहिते पाटील यांचे खासदार बॅनर लागले असून शहरात फटाक्या़ची आतिश बाजी सुरु झाली आहे.

Web Title: solapur lok sabha election result 2024 dhairyasheel mohite patil towards victory maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.