"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:55 PM2024-04-19T21:55:24+5:302024-04-19T21:56:11+5:30

काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

Shah Rukh Khan's 'duplicate' seen in Solapur campaign, BJP targeted congress | "खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

"खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस..."! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. यातच, आता सोलापूरमध्ये शाहरुख खानच्या डुप्लीकेटची एन्ट्री झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे. यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस पक्ष उघडपणे लोकांची फसवणूक करत आहे, असे भाजप प्रवक्ता शाहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे. एवढेच नाही तर, पूनावाला यांनी यासंदर्भातील काही फोटोही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी निवडणूक आयोगालाही टॅग केले आहे. याशिवाय, मुंबई भाजपचे प्रवक्ता सुरेश नाखूना यांनीही एक व्हिडिओ साेशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. या सोबत, काँग्रेस फेक सर्व्हेनंतर, आता फेक कँपेनही करत आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.

काँग्रेसवर निशाणा -
या संदर्भात पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, "काँग्रेसचा आणखी एक घोटाळा. पक्षाने निवडणूक प्रचारासाठी डुप्लिकेट शाहरुख खानला भाड्याने घेतले आहे. हा पक्ष लोकांना किती मूर्ख बनवत आहे, याची कल्पना करा. खोट्या सर्व्हेंना प्रोत्साहन देणे, भारतविरोधी नॅरेटिव्ह सेट करणे, AI आणि deepfakes नंतर, आता डुप्लिकेट सेलिब्रिटीज. आपण समजू शकता की, हा पक्ष का आधीपासूनच ईव्हीएमला दोष देत आहे. 

ही पोस्ट पूनावाला यांनी शाहरुख खानलाही टॅग केली आहे.

Web Title: Shah Rukh Khan's 'duplicate' seen in Solapur campaign, BJP targeted congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.