सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

By Appasaheb.patil | Published: May 7, 2024 10:09 AM2024-05-07T10:09:34+5:302024-05-07T10:09:58+5:30

दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले.

Polling today for Solapur, Madha Lok Sabha; Know the overview of the situation in the morning session | सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

सोलापूर, माढा लोकसभेसाठी आज मतदान; जाणून घ्या सकाळच्या सत्रातील परिस्थितीचा आढावा

आप्पासाहेब पाटील

सोलापूर :सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्र वरील मशीन बंद झालेले होते ते निवडणूक प्रशासनाने सुरू केलेल्या असून मतदान प्रक्रिया त्या केंद्रावर सुरू झालेली आहे.

Web Title: Polling today for Solapur, Madha Lok Sabha; Know the overview of the situation in the morning session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.