राष्ट्रवादीचं 'पुरेपूर पंढरपूर'; जयंत पाटील फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 13:22 IST2021-04-03T11:49:23+5:302021-04-03T13:22:13+5:30

आज दुपारी जयंतराव अन् संजयमामांसोबत कल्याणरावांचं जेवण

Pandharpur Assembly by-election; 'Cooking' campaign plan at Kale's farm house | राष्ट्रवादीचं 'पुरेपूर पंढरपूर'; जयंत पाटील फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा प्लॅन

राष्ट्रवादीचं 'पुरेपूर पंढरपूर'; जयंत पाटील फार्म हाऊसवर आखणार प्रचाराचा प्लॅन

पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी कल्याणराव काळे यांनीही कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. आज दुपारी काळेंच्या आढीवच्या फार्म हाऊसवर जेवणाचा बेत असून तेथेच प्रचाराचा नवा प्लॅन शिजणार आहे.

गेल्या काही दिवसांपासुन भाजपावर नाराज असलेले कल्याण काळे निवडणूकीत कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. काळेंनी पंढरपुरात आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व राष्ट्रवादीचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते पंढरपुरात येत आहेत. 

 काळेंच राष्ट्रवादीसोबत जाण्याच निश्चित झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, संजय शिंदे यांच्यासोबत आढीव फार्म हाउसवर स्नेहभोजन घेत प्रचाराचा नवा प्लॅन  शिजवणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Pandharpur Assembly by-election; 'Cooking' campaign plan at Kale's farm house