माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 16, 2024 15:11 IST2024-04-16T15:10:03+5:302024-04-16T15:11:50+5:30
Lok Sabha Election 2024: धैर्यशील यांच्याकडून विजयसिंह मोहिते-पाटलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.

माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे उपस्थित होते. धैर्यशील यांच्याकडून विजयसिंह मोहिते-पाटलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.
यावेळी माजी आमदार नारायण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी अर्ज स्वीकारला आहे.