पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

By राकेश कदम | Published: April 25, 2024 01:18 PM2024-04-25T13:18:12+5:302024-04-25T13:36:05+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray in Selapur on the same day, Congress tries to 'raid Shae' of Priyanka Gandhi | पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

पंतप्रधान माेदी, उद्धव ठाकरे एकाच दिवशी साेलापुरात, काॅंग्रेसकडून प्रियंका यांच्या ‘राेड शाे’साठी प्रयत्न

- राकेश कदम
साेलापूर - साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची २९ एप्रिल राेजी साेलापुरात जाहीर सभा हाेणार आहे. काॅंग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिलऐवजी २९ एप्रिल राेजी साेलापुरात हाेणार असल्याचे काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई हाेत आहे. महाआघाडी आणि महायुतीमधील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक नरेंद्र माेदी विरुध्द राहुल गांधी असल्याचे भाजप नेते जाहीर सभांमधून सांगत आहेत. भाजपची मदार माेदींच्या सभेवर असल्याचे नेते सांगतात. पंतप्रधान माेदी यांची साेमवारी सकाळी हाेम मैदानावर सभा हाेणार आहे. भाजप नेत्यांची बुधवारी सभेचा मंच उभारण्याची तयारी सुरू केली हाेती. उध्दव ठाकरे यांची सभा ३० एप्रिल राेजी हाेणार आहेत. यात बदल झाला आहे. ही सभा २९ एप्रिल राेजी संध्याकाळी कर्णिक नगर येथील मैदानावर हाेईल.

सिध्दरामय्या, रेवंथ रेड्डीही येणार
काॅंग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांच्या दाेन सभा शनिवारी हाेणार आहेत. दक्षिण साेलापूर तालुक्यातील भंडारकवठे आणि कुंभारी येथे या सभा हाेतील. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीही पूर्व भागात सभा घेणार आहेत. त्यांची तारीख निश्चित झालेली नाही. काॅंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचा साेलापुरात राेड शाे व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Prime Minister Narendra Modi, Uddhav Thackeray in Selapur on the same day, Congress tries to 'raid Shae' of Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.