प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: April 30, 2024 18:11 IST2024-04-30T18:09:54+5:302024-04-30T18:11:05+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : बार्शी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज मध्ये त्यांची सभा होणार आहे. सोलापूर शहरात दुपारी तीन वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या गुरुवारी सोलापुरात तीन सभा
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे गुरुवारी, २ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून या दिवशी सोलापुरात तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. बार्शी तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूज मध्ये त्यांची सभा होणार आहे. सोलापूर शहरात दुपारी तीन वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
सकाळी दहा वाजता लातूरला त्यांची सभा नियोजित आहे. त्यानंतर, साडे अकरा वाजता धाराशिव मध्ये त्यानंतर बार्शी, अकलूज तसेच सोलापूर शहरात त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती वंचितचे प्रवक्ते प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली.