माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 10:07 AM2024-06-04T10:07:47+5:302024-06-04T10:10:24+5:30

Madha lok sabha election result 2024 : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत.

madha lok sabha election result 2024 the third round was stopped as the machine stopped maharashtra live result | माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

आप्पासाहेब पाटील , सोलापूर : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मतपेट्या बंद पडल्याने निकाल थांबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

माढा लोकसभा- माळशिरस विधानसभा मतदारसंघातील दोन मशीन बंद पडल्या. तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता निवडणूक अधिकारी यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील २ ईव्हीएम मशीन पडल्या बंद आहेत. ईव्हीएम मशीन उघडण्यास तांत्रिक अडथळा दाखवला जात आहे. माढा मतदार संघाची तिसरी फेरी थांबवली.

Web Title: madha lok sabha election result 2024 the third round was stopped as the machine stopped maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.