माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 11:39 AM2024-06-04T11:39:24+5:302024-06-04T11:40:17+5:30

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेगाने चालू आहे.

madha lok sabha election 2024 at the end of the fifth round of the madha lok sabha constituency dhairyasheel mohite patil is leading with 19 thousand 552 votes maharashtra live result | माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर

माढा लोकसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते-पाटील १९ हजार ५५२ मतांनी आघाडीवर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी वेगाने चालू आहे. अकरा वाजेपर्यंत पाचव्या फेऱ्याचे निकाल हाती लागले असून पाचव्या फेरीअखेर शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील १९,५५२ मतांनी आघाडीवर आहेत

आतापर्यंतच्या फेरीत एकदाही भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आघाडी नाही. दरम्यान, माण, फलटण, माळशिरस तालुक्यात धैर्यशील मोहिते- पाटील यांना चांगली मते मिळाली आहेत. प्रत्येक फेरीचे निकाल जसे जसे हाती लागत आहेत तशी तशी निकालाची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिले आहे.

 सध्या सहाव्या व सातव्या फेरीचे निकाल हाती येणे बाकी आहे. मतमोजणी वेगात सुरू असून दुपारी चार वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे निकाल हाती येईल अशी माहिती देण्यात आली.

Web Title: madha lok sabha election 2024 at the end of the fifth round of the madha lok sabha constituency dhairyasheel mohite patil is leading with 19 thousand 552 votes maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.