एलटीटी, तिरुपती एक्सप्रेस नवीन वर्षात ही धावणार
By रूपेश हेळवे | Updated: December 20, 2023 17:37 IST2023-12-20T17:36:39+5:302023-12-20T17:37:31+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी व गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची कालावधी वाढवण्यात आले आहे.

एलटीटी, तिरुपती एक्सप्रेस नवीन वर्षात ही धावणार
रुपेश हेळवे,सोलापूर : प्रवाशांच्या सोयीसाठी व गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची कालावधी वाढवण्यात आले आहे. यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनल, तिरुपती एक्सप्रेस आदी सोलापूरकरांसाठी महत्वाच्या असणार्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
यात लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी आता २६ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाडीची मुदत २६ डिसेंबर २०२३ पर्यंत होती. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.
शिवाय सोलापुरातून तिरूपतीला जाणार्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होती. यामुळे तिरूपती एक्सप्रेला सोलापुरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच या गाडीला मुदत वाढ देण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. दरम्यानच सोलापूर-तिरुपती-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत ही वाढवण्यात आली असून ही गाडी आता २८ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. ही गाडी २८ डिसेंबर पर्यंतच धावणार होती.