Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर

By Appasaheb.patil | Published: June 4, 2024 09:30 AM2024-06-04T09:30:48+5:302024-06-04T09:32:33+5:30

Solapur Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सोलापुरातील रामवाडी गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला.

lok sabha election result 2024 madha lok sabha constituency the dhairyashil mohite patil of the sharad pawar group is in a big lead maharashtra live result | Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर

Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सोलापुरातील रामवाडी गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली व पहिल्या फेरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे पाच हजार मताधिक्याने आघाडीवर असल्याची माहिती समोर आली.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक- निंबाळकर व शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील असा अंदाज वर्तविला गेला असला तरी शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्सुकता लागून राहणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी करण्यात आली त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये माढा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघातील मतपेट्या मतमोजणी घेण्यात आल्या

Web Title: lok sabha election result 2024 madha lok sabha constituency the dhairyashil mohite patil of the sharad pawar group is in a big lead maharashtra live result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.