भाजप कार्यकर्ते, माेहिते-पाटील समर्थक साेलापुरात आमने-सामने येणार; मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
By राकेश कदम | Updated: April 15, 2024 20:25 IST2024-04-15T20:24:12+5:302024-04-15T20:25:00+5:30
शक्तीप्रदर्शन करणार

भाजप कार्यकर्ते, माेहिते-पाटील समर्थक साेलापुरात आमने-सामने येणार; मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
साेलापूर : भाजपचे साेलापूरचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने शहरातन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयाेजन केले आहे. भाजप साेडून राष्ट्रवादी पवार गटात गेलेले माढ्याचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील हे सुध्दा मंगळवारीच अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील सात रस्ता परिरसातील भाजप आणि माेहिते-पाटील समर्थक दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्ळणाले, भाजपच्या रॅलीला सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज चाैकापासून सुरुवात हाेईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११.३० च्या सुमाराला या रॅलीमध्ये सहभागी हाेतील. छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते सात रस्ता या मार्गावर रॅली निघेल. सात रस्ता येथे रॅलीचा समाराेप हाेईल आणि येथेच जाहीर सभा हाेईल. यानंतर दाेन्ही उमेदवार दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील.
पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने म्हणाले, धैर्यशील माेहिते-पाटील दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे शेकडाे कार्यकर्ते यावेळी उपस्थित असतील. राष्ट्रवादीचे फलटण, माण तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.